आपल्या आवाजाचा (स्वराचे) प्रभाव विकसित करून जीवनात अधिक समृद्धता आणण्यासाठी स्वराभिनय शिबिर….दैनदिन जीवनात विविध कारणांनी आपला अन्य जगाशी संबंध येतो आणि यामध्ये प्राधान्याने मौखिक संवादाचे प्रमाण अधिक असते. हा मौखिक संवाद साधताना कधी कधी विविध तांत्रिक उपकरणाचाही होत असतो. त्यामुळेच आपले उच्चार व आवाजाची लवचिकता याला अनन्य साधारण महत्व आहे. नेमक्या या दोन गोष्टींकडेच दैनंदिन धावपळीच्या काळात दुर्लक्ष होत असते, असा सार्वत्रिक अनुभव लक्षात घेऊनच या शांततेच्या काळात स्वराभिनय शिबिराची रचना करण्यात आली आहे.

Learning objectives:

आपल्या आवाजाची जोपासना करणे, त्याच बरोबर आवाजात एक सुत्रता आणण्यासाठी करावे लागणारे व्यायाम

Who can attend

सर्वांसाठी खुले

Programme Dates:

Session Plan

Session 1 –  10.30 – 11.30
Session 2 – 4.30 – 5.30

Batch Size

३०-३५ अपेक्षित संख्या

Medium:

मराठी

Fee Details

₹ 500/-

स्वराभिनय शिबिर

 

Programme Coordinator(s)

कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी

देवेंद्र पै, 9004396955, devendrap@rmponweb.org,
अनिल पांचाळ, 9975415922 dilipn@rmponweb.org

BATCH I : Report of Swaraabhinay Shibir

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्वराभिनय शिबिर कार्यक्रम अहवाल

ओम् सहना ववतु, सहनौ भुनक्तु
सहवीर्यं करवावहि, तेजस्विनां धितमस्तु
मा विद्विषावहै
ओम् शांन्ति : शान्ति : शान्ति :

या श्लोकाने ऑनलाईन स्वराभिनय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत आणि स्वरशास्त्राचे गाढे अभ्यासक मा. प्रमोद पवार यांनी केले. दि. २०-२१ मे २०२० या दोन दिवसीय ऑनलाईन ‘स्वराभिनय प्रशिक्षण शिबिर’ संपन्न झाले. या शिबिरात महाराष्ट्र व गुजरात राज्यातील पाच जिल्ह्यातून २२ (महिला १२, पुरूष १०) प्रतिनीधींनी सहभाग घेतला होता. भाषा आपली जननी आहे आणि संस्कृत हे आपले मूळ आहे. विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रत्येकाला आवाजाची गरज असते. तशीच त्याची जोपासना, संगोपन व साधनेची गरज असते. आवाज हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा भाग असून प्रत्येकाला आवाजाची सजगता अवगत असली पाहिजे. आवाज ही माणसाची खरी ओळख असते. व्यक्तिमत्व विकास, देहबोली, सादरीकरण, निवेदन व सूत्रसंचालन यामध्ये देहाच्या सौंदर्यवर्धनाची गरज आवाज पूर्ण करत असतो. ओंकार, प्राणायाम, वर्णोच्चार, शब्दोच्चार आणि व्याकरण यांचा अभ्यास करणे व त्याचा सतत सराव करणे आणि या सर्वामध्ये सातत्य असणे खूप महत्त्वाचे असते. आवाज निर्मिती, सुयोग्य श्वसन आणि श्वासोच्छवासावर आपणांस ताबा मिळवता आला पाहिजे. सप्तकानुसार आवाजाचा पोत बदलता आला पाहिजे. आवाज निर्मिती करताना येणारा ताण व तो ताण निवारण्यासाठी उपाय व करावयाची साधना त्याचप्रमाणे आवाज बसणे, आवाजात विविध प्रकारे अडचणी निर्माण होणे आणि आवाजाच्या तक्रारी या बाबतची कारणे व त्यावर अवगत असलेले उपाय यांची माहिती दिली. आपले स्वरयंत्र तंदूरस्त ठेवणे व त्याची ताकद वाढविणे या साठी नियमितपणे ब्रम्हमुद्रा, जिव्हाबंद, सिंहमुद्रा, पर्वतासन आणि प्राणायामाचा सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार, आदिंचा वापर आपण आपल्या वाचनात केला पाहिजे. स्वर व उच्चाराचे महत्त्व, स्वराचा प्रभावी वापर व आवाजाची जोपासना, स्वर विकसनासाठी साधना या विषयांवर मार्गदर्शन व सराव करुन घेण्यात आला. कोणत्याही क्षेत्रात मग ते अभिनय, शिक्षण क्षेत्र असो शेवटी आवाजाला फार महत्त्व असते. आवाजाची जोपासना या क्षेत्रात अशोक रानडे यांच्यासारख्या तज्ञांनी खूप मोठे योगदान दिले आहे. असे मा. प्रमोद पवार यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरातील सर्व सहभागी प्रतिनिधींना ई- प्रमाणपत्र देण्यात आली. शेवटी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व हे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

प्रशिक्षण शिबिरातील प्रतिनिधींनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया :
• आवाजाची जोपासना (आवाजकी दुनिया) प्रत्यक्ष दोन दिवस अनुभवता आली.
• आवाजाबद्दल तांत्रिक गोष्टींजी माहिती मिळाली. सुस्पष्ट उच्चारांसाठी उत्तम व्यायामाची गरज असते.
• आवाजातील दोष कमी करण्याचे उपाय, मोठ्याने वाचन करणे आणि प्रत्येक गोष्टीचा करावा लागणारा सराव या बद्दल विशेष मार्गदर्शन मिळाले.