आजचं युग हे समाजमाध्यमांचं ! फेसबुक, व्हॉट्सअॅपपासून कोरापर्यंत अनेक समाजमाध्यमं आणि संकेतस्थळांनी आपलं जीवन व्यापून टाकलं आहे. पण या सगळ्यातही कुतुहल नि आकर्षणाचा विषय ठरलं आहे ते ‘ट्विटर’ ! एखादे राजकीय नेते काहीतरी ‘ट्विट’ करतात नि त्याची बातमी होते. एखाद्या सेलिब्रिटीचं ‘ट्विट’ जगभरातला चर्चेचा विषय होतो. कोणीतरी ‘ट्रोल’ होतं, नवे ‘ट्रेंड्स’ निर्माण होतात, त्यावरून वादळं उठतात नि एखाद्या सकारात्मक विचाराला बळही मिळतं. मोजक्या शब्दात अवघ्या चराचराला व्यापण्याचं अर्थात जगाच्या कानाकोप-यात पोहोचण्याचं ‘ट्विटर’चं हे सामर्थ्य लक्षात घेऊनच आयोजित करीत आहोत, ही अनोखी कार्यशाळा ‘मैत्री ट्विटरशी’ ! मायक्रोब्लॉगिंगचं प्रभावी माध्यम असलेल्या ‘ट्विटर’च्या सुयोग्य वापरानं बळ मिळेल सकारात्मक विचारांना, गती मिळेल कितीतरी उपक्रमांना नि उभारी घेतील हजारो युवास्पंदनं ! आणि म्हणूनच न चुकता तुम्हीही करायलाच हवी अशी ही कार्यशाळा !
Learning objectives:
- ट्विटरची कूळकथा
- ट्विटरमधील संज्ञा आणि संकल्पना
- ट्विटरचा प्रत्यक्ष वापर
- ट्विटरसाठी आशय लेखन
- ट्विटर थ्रेड्स तयार करणे
- प्रासंगिक ट्विट्स आणि त्याची इको सिस्टिम
- ट्विटरचा सकारात्मकतेसाठी वापर आणि बरंच काही…!
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates: 23-24 January 2021
Session Plan: 2 days with 1 class a day
Session 1 – 10:00 am -04:30 pm
Batch Size
60-70
Medium:
मराठी
Fee Details
रु. 750/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponwebo.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org
शुभम बागडे (9762909085) shubhamg@rmponweb.org