व्यासपीठापासून रंगमंचापर्यंत अन् नभोवाणी, दूरचित्रवाणीपासून सध्याच्या दूरदृश्यप्रणाली पर्यंत, कुठल्याही कार्यक्रमाचा अविभाज्य घटक म्हणजे निवेदक ! कार्यक्रम विशिष्ट उंचीवर नेणं, यशस्वी करणं बरंचसं या निवेदकावर अवलंबून असतं. ग्लॅमर, प्रसिद्धी देणाऱ्या या क्षेत्रात कुठल्याही वयोगटातील असाल तरी अर्थार्जनाच्याही असंख्य संधी आज उपलब्ध आहेत. चांगलं लिहिता येतंय ? बोलण्याची आवड आहे ? स्टेजवर मिरवायची हौस मनात उफाळून येतेय ? तर मग तुमच्यासाठीच आहे ही कार्यशाळा… झगमगत्या दुनियेतील खास व्यक्तीसोबत… अभिनेते अभिजित खांडकेकर आणि महाराष्ट्राचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत ! जाणून घ्या “गोल्डन रुल्स ऑफ अभिजीत” तसेच गाडगीळ यांनी सांगितलेल्या ‘युक्तीच्या चार गोष्टीही !’ अन् व्हा यशस्वी निवेदक…
Learning objectives:
- निवेदन-सूत्रसंचालन यातील फरक
- कार्यक्रमासाठी संहितालेखन
- कर्यक्रमाची पूर्वतयारी
- निवेदन-सूत्रसंचालनाची तंत्र, कौशल्ये
- विविध माध्यमांसाठी निवेदन
- उत्तम निवेदनासाठी आवश्यक बाबी
या क्षेत्रातील संधी या खेरीज वैयक्तिक कृतिसराव आणि आणखी बरंच काही…!
Who can attend
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि खाजगी क्षेत्रातील निवेदन-सूत्रसंचालनाची आवड असलेले सर्व,
Programme Dates: 15-16 May 2021
Session : 10:00 am to 5:00 pm
Batch Size
50-60
Medium:
मराठी
Fee Details
रु. 850/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी
Resource Persons
अभिनेते अभिजीत खांडकेकर आणि महाराष्ट्राचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponwebo.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org