सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच लोकप्रतिनिधींनाही भाषण कलेची व संवाद कौशल्याची आवश्यकता असते. आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे आहे या पार्श्वभूमीवर भाषण कला आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे अनिवार्य बनले आहे, ही अनिवार्यता लक्षात घेऊनच प्रबोधिनीतर्फे भाषण कला आणि संवाद कौशल्य याची ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.
Learning objectives:
सध्याच्या स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणाऱ्या काळात भाषण कला आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे.
Who can attend
सर्वांसाठी खुले
Programme Dates: 16-18 June 2020
Session Plan: 3 दिवस (प्रती दिवस 2 सत्र)
Session 1 – 10.00 am – 11.00 am
Session 2 – 04.00 pm – 5.00 pm
Batch Size
२५ – ३० अपेक्षित संख्या
Medium:
मराठी
Fee Details
₹1050/-(including GST)
Programme Coordinator(s)
कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी
शैलेश गोखले, 8108955966, shaileshg@rmponweb.org
शीतल पंचाल, 9930765035, sheetalp@aic-rmp.org
Sorry, but this form is no longer accepting submissions.
BATCH I : Report of ऑनलाईन भाषण कला कार्यशाळा
भाषण कला आणि संवाद कौशल्य ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन दि.१६ जून रोजी राज्यसभा खासदर,प्रबोधिनी उपसंचालक मा.डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी प्रबोधिनीचे महासंचालक मा.श्री.रविद्र साठे आणि कार्यकारी प्रमुख ( प्रकल्प आणि प्रशासन ) मा.श्री.रवि पोखरणा उपस्थित होते. दि. १६-१७-१८ जून २०२० हे तीन दिवस ऑनलाईन ‘भाषण कला आणि संवाद कौशल्य कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील १०जिल्ह्यातून तसेच गोवा राज्यातून, एकूण ३६ (महिला १८, पुरूष १८) प्रतिनीधींनी सहभाग घेतला होता.
या तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत रोज २ अशी तीन दिवसात एकूण ६ सत्रे झाली. पहिल्या सत्रात मा. विनयजींनी भाषण कसे बेतावे? या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच भाषण करण्या मागचा उद्देश, विचारप्रवाह,मांडणी यावर सखोल मार्गदर्शन केला आणि सर्व सहभागींना भाषण कला जोपासण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या सत्रात प्रा. अविनाश कोल्हे यांनी वाचन आणि व्यासंग याचे भाषण कलेतील महत्व पटवून दिले त्याच प्रमाणे भाषण चांगले व्हावे या साठी वाचन कशा प्रकारे करावे आणि त्यातून कशा टिपणी लिहून काढाव्या ज्याचा उपयोग सखोल भाषण करताना होऊ शकतो ह्याचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी दि.१७ जूनला कार्यशाळेचे तिसरे सत्र उच्चार शास्त्र आणि आवाजाची जोपासना याची सुरवात दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत आणि स्वरशास्त्राचे गाढे अभ्यासक मा. प्रमोद पवार यांनी केली.
ओंकार, प्राणायाम, वर्णोच्चार, शब्दोच्चार आणि व्याकरण यांचा अभ्यास करणे व त्याचा सतत सराव करणे आणि या सर्वामध्ये सातत्य असणे खूप महत्त्वाचे असते.आपले स्वरयंत्र तंदूरस्त ठेवणे व त्याची ताकद वाढविणे या साठी नियमितपणे ब्रम्हमुद्रा, जिव्हाबंद, सिंहमुद्रा, पर्वतासन आणि प्राणायामाचा सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार, आदिंचा वापर आपण आपल्या वाचनात केला पाहिजे.स्वर व उच्चाराचे महत्त्व, स्वराचा प्रभावी वापर व आवाजाची जोपासना, स्वर विकसनासाठी साधना या विषयांवर मार्गदर्शन मा.प्रमोद पवारजी यांनी केले