महाराष्ट्र – द-याखो-यांचा गिरीशिखरांचा, दुर्ग-किल्ल्यांचा प्रदेश ! संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, अशा कलांमध्ये रंगून जाणारा प्रदेश ! शतकानुशतकांपूर्वीपासून इथल्या माणसांनी विविध क्षेत्रातल्या आपल्या ज्ञान-कला-कौशल्यानं या महाराष्ट्राला समृद्ध केलं. याची साक्ष देत आजही शेकडो मंदिरं, किल्ले, लेणी, संग्रहालयं दिमाखात उभी आहेत. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा म्हणजे खरं तर मोठा कुतुहलाचा विषय ! पण कोणत्याही कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर तशी सौंदर्यदृष्टी हवी.त्यासाठीच महाराष्ट्राच्या ६१ व्या स्थापनावर्षानिमित्त आयोजित करत आहोत….. एक दिवसीय सहा कार्यशाळांची विशेष मालिका !

महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभव नेमकं कसं पाहावं याची नवी सौंदर्यदृष्टी प्रदान करणारी, चुकवूच नये अशी मालिका ! या मालिकेचे पहिले पुष्प गुंफले जात आहे ते , “प्राचीन मंदिरे कशी पहावीत” या, मंदिरांचे शिल्पवैभव उलगडणा-या विषयाने !

अद्वितीय शिल्पसौंदर्याने विनटलेली प्राचीन मंदिरं म्हणजे आपला ऊर्जस्वल सांस्कृतिक वारसा ! गिरीशिखरांवर विराजमान झालेल्या, द-याखो-यात लपलेल्या, आडवळणांवर विसावलेल्या अशा असंख्य प्राचीन मंदिरांनी महराष्ट्राचं राकट सौंदर्य खुलवलं. मंदिरांच हे वैभव आपल्याला बरंच काही उलगडून दाखवत असतं. ते आकळण्यासाठी नवी दृष्टी देणारी ही आगळीवेगळी कार्यशाळा !

* विशेष आकर्षण *

संपूर्ण मालिकेसाठी प्रवेश घेणा-यांस !! वारली चित्रकला कार्यशाळा मोफत !!

Learning objectives:

  1. मंदिरांचा उगम, निर्मिती आणि विकास
  2. प्राचीन मंदिरांचे प्रकार
  3. मंदिरांचे विविध घटक आणि वैशिष्ट्ये
  4. मंदिरातील आणि मंदिरावरील मूर्तिवैभव
  5. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि त्यांची वैशिष्ट्ये

Who can attend

वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, मूर्तीशास्त्र, इतिहास, विज्ञान, अध्यात्म तसेच महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेणा-या सर्वांसाठी

Programme Dates: 13 June 2021

Session : 10:00 am to 05:00 pm

Batch Size

50-60

Medium:

मराठी

Fee Details

रु.700/- प्रत्येकी (जी.एस.टी.सह) ; सहा कार्यशाळांच्या मालिकेसाठी रु.3600/- प्रत्येकी

Resource Persons

  • आशुतोष बापट
  • डॉ. मंजिरी भालेराव

महाराष्ट्राची सांस्कृतिक तोंडओळख - ऑनलाईन सहा कार्यशाळांची मालिका "प्राचीन मंदिरे कशी पहावीत" - ऑनलाईन कार्यशाळा

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org
राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponweb.org