‘बालपणीचा काळ सुखाचा’…. घडीघडी आठवणारा…! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्याने जाणवणारा ! पुन्हा पुन्हा भूतकाळात घेऊन जाणारा ! खेळण्याबागडण्यात रमलेलं, खोड्यामस्करीमध्ये गुंतलेलं नि कधी कधी काही भन्नाट करू पाहणारं हे बालपण चित्रित होत जातं बालकथा नि कवितांमधून ! काळाच्या नव्या वळणांवर हे बालपण टीव्ही मोबाईलमध्ये गुंतून, भीम डोरेमॉन बघत ‘डिजिटल ‘ होऊ पहात असलं तरी त्यातील बालसुलभ खोडकरपणा नि निरागस लाघवीपण अजूनही तसंच कायम आहे. हे बाल्य फुलविण्यासाठी तितक्याच ताकदीचे बालसाहित्य आज निर्माण होतंय का ? मुलांमध्ये रमताय ना….? त्यांचं भावविश्व तुम्हालाही भुरळ घालतंय ना…? मग नक्की यायलाच हवं अशी ही कार्यशाळा… कार्यशाळेला या नि लिहायला लागा छानशा गोष्टी नि धम्माल गाणीही…

Learning objectives:

 • बालकथा कशी असावी, कशी लिहावी
 • बालकवितेची बलस्थाने
 • त्यासाठीचे अनुभवविश्व, विषय वैविध्य
 • सर्जनशीलता आणि भाषाशैली
 • बालसाहित्यातील नवे प्रवाह
 • प्रत्यक्ष लेखन आणि कृती सराव आणि या याखेरीज बरच काही….

Who can attend

बालसाहित्यिक, शिक्षक, कवि, लेखक, पत्रकार, बालसाहित्याचे चित्रकार, बालसाहित्याची / बालसाहित्य लेखनाची आवड असणारे सर्व.

Programme Dates: 29-30 May 2021

Session : 10:00 am to 5:00 pm

Batch Size

50-60

Medium:

मराठी

Fee Details

रु. 850/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी

बालकथा-बालकविता: लेखन आणि आस्वाद - ऑनलाईन कार्यशाळा

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponweb.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org

बालसाहित्य लेखन आणि निर्मिती (ऑनलाईन कार्यशाळा) भाग १

 • कार्यशाळा फार प्रेरणादायी होती. आपणही लेखन करावे अशी इच्छा अंतरी जागृत करणारी होती.
 • कार्यशाळा उत्तम झाली. अपेक्षेपेक्षा खूप जास्त माहिती मिळाली.
 • सर्व गोष्टी उत्तम प्रकारे समजल्या , मुलांसोबत काम करताना या गोष्टी लक्षात ठेवू , भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, चांगल्या वक्त्यांना ऐकायची संधी मिळाली .
 • कार्यशाळा उपयुक्त वाटली. राजीव तांबे यांनी ती समर्थपणे पेलली व अपेक्षित उंचीला नेली. चारुहास, गिरीश, किरण यांची मनोगतेही भावली.
 • कार्यशाळा छान झाली.उपयोगी माहिती मिळाली.मुलांना आवडेल असे साहित्य निर्माण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.पुढील लेखन करताना,तसेच चित्र काढताना त्याचा उपयोग नक्की होईल.

या आहेत प्रबोधिनीच्या पुण्यातील संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्राच्या वतीने दि. २४ आणि २५ एप्रिल २०२१ रोजी आयोजित केलेल्या “बालसाहित्य – लेखन आणि निर्मिती” या कार्यशाळेतील काही सहभागींच्या निवडक प्रतिक्रिया…!

मुलांचं भावविश्व नेमकं उलगडतं कसं, ते फुलवायचं कसं, त्यातून प्रतिभेचे नवे अंकुर पालवताना त्यांचं संवर्धन कसं करावं नि या सगळ्यामधून बाल्य फुलवित नेणारं साहित्य कसं लिहावं, याची उकल करणारी ही कार्यशाळा होती. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक राजीव तांबे, किरण केंद्रे, आबा महाजन, चारुहास पंडित, गिरीश सहस्रबुद्धे, राजीव बर्वे, डॉ. श्रुती पानसे आणि स्वाती महाळंक यांनी सहभागींशी संवाद साधला होता.

बालसाहित्य या काहीशा दुर्लक्षित होत चाललेल्या साहित्य प्रकाराला नवी उर्जा देण्यासाठी आणि पर्यायाने नव्याने लेखन करीत असणा-या मंडळींना नेमकी दिशा देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

म्हणूनच या वाटचालीतील पुढचं पाऊल असलेली कार्यशाळा म्हणजे “बालकथा – बालकविता लेखन आणि आस्वाद”.

मुलांध्ये मन रमून जातं? बालसाहित्य लिहायला आवडतं?

तर मग ते अधिक नेमकेपणानं आणि प्रभावीपणे लिहिण्यासाठी करायलाच हवी अशी ही कार्यशाळा !