समुपदेशन म्हणजे काय ? त्यातील विविध पध्दती कोणत्या ? त्याचप्रमाणे हे समुपदेशन उत्तमरित्या व शास्त्रशुध्द पध्दतीने कसे करता येईल, या विषयी जाणून घेण्यासाठी समुपदेशनाची मूलभूत ओळख करुन देणारा ‘समुपदेशन परिचय अभ्यासक्रम’ आयोजित केला असून आजच्या संघर्षमय जीवनात तसेच सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या अभ्यासक्रमाचा आपणांस उपयोग होवू शकतो…

Learning objectives:

 1. मानवी वाढ आणि विकासाचे टप्पे, कुटुंब, शाळा, शेजारी आणि कामाच्या स्थानाचे महत्त्व समजून घेणे.
 2. मानसशास्त्राची तोंड ओळख.
 3. मानसिक आरोग्य, स्वास्थ्य संकल्पना, मानसशास्त्रीय समस्या.
 4. समुपदेशन व्यवसायाची ओळख
 5. विविध क्षेत्रातील समुपदेशन
 6. समुदाय मानसिक आरोग्य संकल्पना
 7. समुपदेशन प्रक्रिया
 8. समुपदेशन सिध्दांत ओळख – १, २, ३
 9. समुपदेशन उपचार पध्दती दृष्टीकोन – १, २
 10. व्यावसायिक ‘स्व’ आणि वैयक्तिक ‘स्व’ चा विकास
 11. समुपदेशन तंत्रे आणि कौशल्ये – १, २
 12. समुपदेशनामधील नीतीमूल्ये
 13. उत्तर- आधुनिक समाजापुढील आव्हान

Who can attend

शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, फिल्ड वर्कर, आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका अशा अनेकांना या समुपदेशन कौशल्याचा उपयोग निरोगी समाज निर्मितीसाठी करता येईल. आपले योगदान समाजाला निश्चितच सुदृढ बनविण्यास सहाय्यभूत ठरेल.

Medium:

मराठी

Programme Dates: 8-13 March 2022

दि. ८ – ११ मार्च २०२२, प्रती दिन २ सत्र वेळ : संध्याकाळी ०५.०० ते ०६.३०, ०७.०० ते ०८.३० शनिवार, दि. १२ व रविवार, दि. १३ रोजी पूर्ण दिवस वेळ : सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००

Batch Size

40

Fee Details

₹ 1200 (inclusive of taxes)

Resource persons

मार्गदर्शक :
डॉ. स्वाती अमराळे जाधव, स्तंभलेखिका व संशोधक
डॉ. संदीप जगदाळे, सहयोगी प्राध्यापक, वालचंद महाविद्यालय, सोलापूर
क्षमा कौशिक, कार्यकारी सचिव, राजस्थान महिला कल्याण मंडळ, अजमेर
डॉ. प्रशांत भोसले, सहाय्यक प्राध्यापक, लो.म. चौधरी महाविद्यालय , जळगाव

समुपदेशन परिचय अभ्यासक्रम (आभासी)

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

Dilip Navele, 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal, 9975415922, anilp@rmponweb.org
Gandhar Bhandari, 8851366407, gandharb@rmponweb.org

BATCH I : समुपदेशन परिचय अभ्यासक्रम (ऑनलाईन)

एक साद आपल्यासाठी…

कोविड-१९ संसर्ग, अपरिहार्य टाळेबंदी आणि टाळेबंदीतून पूर्वपदावर येत असलेले जनजीवन याचा प्रभाव आपल्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनात दिसून येवू लागला.

या सर्व घडामोडीत मानसिक आरोग्यावरील परिणाम दृष्य स्वरुपात सामोरे येत आहेत. आपले कुटुंब, शेजारी, नातेवाईक, सहकारी, मित्र- मैत्रिणी या सर्वांना एक मदतीचा हात आपण देऊ शकतो. त्याचसाठी समुपदेशनाची मूलभूत ओळख करुन देण्यासाठी दिनांक १८ ते २३ जुलै २०२० कालावधीत म्हाळगी प्रबोधिनीने ‘समुपदेशन परिचय अभ्यासक्रम’ (ऑनलाईन) आयोजित केला होता. सदर वर्गासाठी गोवा, राजस्थान, महाराष्ट्रातील अकरा जिल्हयातील २३ महिला आणि २० पुरुष असे एकूण ४३ प्रतिनिधी उपस्थित होते. सदर अभ्यासक्रमाचे उद्घाटन प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केले. तसेच ज्यांनी या अभ्यासक्रमाची रचना करून हा अभ्यासक्रम तयार केला अशा डॉ. स्वाती अमराळे जाधव यांनी या अभ्यासक्रमामागची भूमिका स्पष्ट केली.

डॉ. स्वाती अमराळे जाधव म्हणतात, मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या विशिष्ट कल्पना आहेत. खरे पहाता आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वळणावर त्याचप्रमाणे भावनिक, शारीरिक समस्यांना सामोरा जाणा-या प्रत्येकाला समुपदेशनाची गरज भासते.

सदर अभ्यासक्रमामध्ये एकूण १६ विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मानसशास्त्राची तोंडओळख व  मानसशास्त्रीय समस्या, समुपदेशन व्यवसायाची ओळख, विविध क्षेत्रातील समुपदेशन, समुपदेशन प्रक्रिया, सिध्दांत, उपचार पध्दती, तसेच समुपदेशन तंत्रे व कौशल्ये आणि समुपदेशनामधील नितीमुल्ये अशा विविध विषयांवर डॉ. स्वाती अमराळे जाधव, डॉ. क्षमा कौशिक, डॉ. संदीप जगदाळे आणि डॉ. प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले.

एकंदरीत आरोग्यविषयक क्षेत्रात मराठीत कमी साहित्य असूनही चारही वक्त्यांनी या प्रशिक्षणातील सर्व विषयांची सादरीकरणाद्वारे उत्तमरित्या मांडणी केली.

समुपदेशन म्हणजे जादू नाही. डॉक्टर शारीरिक व्याधीवर उपचार करतात, त्याप्रमाणेच समुपदेशक मानसिक समस्येवर उपचार करतात. समुपदेशन ही एक शास्त्रशुध्द प्रक्रिया आहे ज्यामध्ये समुपदेशक एखादी समस्या दूर करण्यासाठी विशिष्ट पध्दतीने, हेतूने पिडीत व्यक्तीवर समुपदेशन करत असतो.  प्रशिक्षित मानसशास्त्रीय सिध्दांतावर आधारित प्रक्रिया राबवणा-या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते.

प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणा-या समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही. असे डॉ. मीना शिलेदार यांनी आपले विचार या प्रशिक्षण वर्ग समारोप प्रसंगी व्यक्त केले. समारोप प्रसंगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे केले जातील असे रवींद्र साठे यांनी सांगितले. शेवटी सर्व प्रतिनीधिंना या प्रशिक्षणाचे ई-प्रमाणपत्र देवून प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले समारोप सत्राचे संचालन केले, तर अनिल पांचाळ, कार्यक्रम समन्वयक यांनी सर्वांचे आभार मानले. अशा प्रकारे सहा दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.

प्रतिनिधींच्या निवडक प्रतिक्रिया :

 • अभ्यासक्रमातील सर्व विषयांची मांडणी उत्तम, अधिकाधिक सहज,नेमक्या, सोप्या आणि चर्चात्मक पध्दतीने करण्यात आली.
 • अभ्यासक्रमात याविषयांवरील साहित्य व विविध वृत्तपत्रातील लेखांची माहिती मिळाली.
 • अभ्याक्रमाचे योग्य नियोजन, योग्य विषयांची निवड आणि योग्य वक्ते, त्यामुळे या वर्गात मिळालेल्या   प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा करून घेवू.
 • पुढील काळात प्रबोधिनीने याच विषयावर प्रगत अभ्यासक्रमाचे नियोजन करावे.