सुसंस्कृत प्रभावी विचार मांडण्यासाठी संस्कृती आत्मसात करणे अत्यंत जरुरी आहे. विचार आणि शब्दांना एक धार निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाने विषयाची मांडणी करणे जरुरी असते. या आत्मविश्वासाला देहबोलीची योग्य साथ मिळाल्यास श्रोत्यां पर्यंत विषय सरळ आणि सोप्या भाषेत पोहचवता येतो. उत्तम वक्ता होणे जितके जरुरी आहे तितकेच प्रभावी वक्ता असणे गरजेचे असते, आपल्या वक्तव्यावर प्रभाव निर्माण होण्यासाठी वाचन आणि व्यासंग भाषण कलेत महत्वाचे अविभाज्य अंग आहे. वाचनाची आवड आणि त्या वाचनाचे परिक्षण करण्यातून अभ्यासू वृत्ती विकसित होण्यास मदत होऊन कोणत्याही विषयाचा सुक्ष्म अभ्यास करणे भाषण कलेत महत्वाचे आणि जरुरी असते.
हे आणि या सारखे अनेक विषय या वर्गात शिकायला मिळाले. नवीन परिचय आणि एक नवीन संघटन या वर्गातून उदयास आले. प्रभोधिनीचा परिवारात एक मोठ्या वृक्षात बदलला आहे, त्या वटवृक्षाच्या छायेत अनेक कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन समाज सेवा करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत. वर्गप्रमुख शैलेशजी आणि शीतल ताई या सारखे असंख्य कार्यकर्ते अहोरात्र एक ध्यास घेऊन कार्यविस्तार करत आहेत.भिविष्यात आपण सगळे जण या कार्यविस्ताराचा एक भाग होऊन सतत संपर्कात राहून प्रभोधिनी करता आपले योगदान देऊ.