“स्वरुपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर,हाच अभ्यासक्रम दोन टप्प्यांत करता येईल का याचा विचार आपण करायला पाहिजे,म्हणजे भाग एक आणि दोन असं म्हणजे सखोल होईल.तसे हे स्वरुप पण अचूक होते पण आटोपशीर वाटले, एकंदरीत सगळे स्मरणात राहील असे होते.

सुर्यकांत बाबाजी जगताप पिंपळनेर

बहुतेक सर्वच मार्गदर्शक वक्ते आणि त्यांचा व्यासंग आणि अभ्यास परिचयाचा होता. चारी दिवसातील एकत्रित प्रभाव, हिंदुत्व या विषयाची जाणीव-जागृती खूपच तीव्र करून गेला.

अरुण दिनकर फडके

हिंदुत्व आणि एकूणच हिंदू धर्म ह्या विषयी तरुण पिढीत नव्याने जागृती यायला लागली आहे.पण ह्या विषियाची म्हणावी तशी माहिती त्यांना पुरेपूर उपलब्ध होत नाही. त्या मुळे ह्या पद्धतिचा अभ्यासक्रम काळाची गरज आहे.

रश्मी रविंद्र पांचाळ