प्रमोद सरानी पहिल्याच सत्रामध्ये व्यायाम शिकवले आणि मला suddenly hopes आले. अतिशय limited वेळा मध्ये सरानी गप्पा मारता मारता भरपूर शिकवले. गाण्यासारखा चांगले बोलण्यासाठी सुद्धा रियाजाची गरज असते हे समजले. आणि आजच्या शेवटच्या सत्रामधील breathless ची ट्रिक ही तर पर्वणीच होती. सिंह म्हटले की सरानी केलेली action च डोळ्यासमोर येईल. इतक्या छान workshop साठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चे खूप खूप आभार. प्रमोद सरांचे खूप खूप आभार.

वैयजंती गुप्ते, गांधी नगर, गुजरात

सर्वप्रथम तर उपेंद्र दाते यांचे मनापासून आभार… त्यांनी ह्या कार्यशाळेबद्दल कळवल्यामुळे मला ही कार्यशाळा करता आली… मी गेली 20 वर्ष नाट्य क्षेत्रात काम करतोय.. या 20 वर्षात खूप गोष्टी कळल्या आहेत.. पण प्रमोद दादा कडून काहीतरी नवीन मिळणार ह्याची खात्री होती… मी प्रमोद दादा म्हणल्यामुळे काहींच्या भुवया उंचावल्या असतील. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की मी प्रमोद दादा बरोबर नाटकातून एकत्र काम केलं आहे.. तेव्हापासून प्रमोद दादा कडून आवाजबद्दल तांत्रिक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.. पण नाटकाचे प्रयोग, दौरे, आणि नंतर दादाचा व्यस्त असणारा दिनक्रम ह्यामुळे ते शक्य झालं नव्हतं… पण आता रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळाली.. सर्व आयोजक टीमचे मनःपूर्वक आभार… 🙏🏻😊

मंगेश दिवाणजी, पुणे

मी प्रमोद पवार सरांना TV वर पाहिले होते, त्यामुळे आता प्रत्यक्ष त्यांना ऐकायला मिळणार, याचा खूप आनंद झाला होता. पण सरांबरोबर मला बोलायला मिळालं, तो आनंद मी शब्दांत व्यक्त नाही करू शकत. मला खूप नवीन आणि छान गोष्टी शिकायला मिळाल्या आणि नवीन group पण (आवाज की दुनिया) मिळाला. त्यामुळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे आणि प्रमोद पवार सरांचे खूप खूप आभार.

जयश्री कुलकर्णी, सांगली

Sagli satra chhaan zali. Me aawajachi kshamata vadhavnyakarta kahitari shodhat astanach hya karyashaalebaddal kalala aani mala je hava hota te milala. Rambhau Mhalgi Prabodhiniche aabhaar! Pramod Pawar sir, tumhi atyanta manaapasun shikavlat. Kuthehi haatcha raakhun na thevta bharbharun dilat…. amhaa saglyanna saamavun ghetlat, samjun ghetlat…. tyamule shiknyasathi poorak asa vaatavarn tayaar zala.
hanyawaad…. Apan sagle ekmekanchya samparkaat raahooch!

Rohan Medhi, Kalyan