सध्याचा जमाना हा प्रेझेंटेशनचा आहे, असं म्ह्टलं जातं ! ‘बिईंग प्रेझेंटेबल’ ही आजची सर्वच क्षेत्रातली निकडीची गोष्ट ! हे ‘प्रेझेंटेबल’ असणं आता फक्त राहणीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. प्रसारमाध्यमं घराघरात पोहोचली असताना आणि ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील माणसंही जगभरात संचार करीत असताना, आपल्याजवळ असलेलं ज्ञान-अनुभव, विचार, मतं यांचं भांडार खुलं करून दाखविण्याचे अनेक प्रसंग येतात आणि संधीही ! अशा वेळी व्यक्त होता येणं, आपल्याला जे वाटतं ते नेमकेपणानं समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं या अर्थानं हे प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं ठरतं.

पण अशा वेळी नेमकं बोलायचं कसं नि सांगायचं काय? व्यासपीठावर माईकसमोर उभं राहताना पाय लटपटतात नि कॅमेरा समोर असला की चेहरा घामानं डबडबतो. रेकॉर्डिंग करायचं म्हटलं की घशाला कोरड पडते नि ऑनलाइन बोलायचं असलं आणि समोर कुणी दिसलं नाही की मन खट्टू होऊन जातं.

असेच काहीसे अनुभव आहेत का तुमचेही? तर मग सादरीकरणाचं तंत्र नि कौशल्य माहीत असायलाच हवं ! त्यासाठीच आहे ही आगळीवेगळी कार्यशाळा… चार वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला ख-या अर्थानं प्रेझेंटेशन शिकवत ‘प्रेझेंटेबल’ बनवणारी!

Learning objectives:

  1. कोणत्याही प्रकारच्या सादरीकरणासाठी पूर्वतयारी
  2. व्यासपीठा (स्टेज) वरील सादरीकरण
  3. नभोवाणी (रेडिओ) साठी सादरीकरण
  4. दूरचित्रवाणी (टी.व्ही.) साठी सादरीकरण
  5. दूरदृश्यप्रणालीद्वारे (ऑनलाइन) सादरीकरण

Who can attend

सर्वांसाठी खुले(Open for all)

Programme Dates: 30-31 October to 01 November 2020

Session 1– 10.00 am – 04.00 pm

Batch Size:

60-70

Medium:

मराठी

Fee Details

रु.850/- (प्रतिव्यक्ती)

प्रभावी सादरीकरण

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query please contact

राहुल टोकेकर, 9822971079, rahult@rmponwebo.org
संतोष गोगले, 9226448481, santoshg@rmponweb.org
शुभम बागडे , 9762909085, shubhamg@rmponweb.org