माणसाला नेहमीच अवगत असावीत अशा आवश्यक कौशल्यांपैकी एक म्हणजे लेखन कौशल्य ! कुठलीही गोष्ट कायम स्मरणात रहावी असं वाटत असेल तर ती ‘लिहून ठेवावी’ असं नेहमी म्हटलं जातं. मोरपीस आणि बोरू-टाकापासून आता संगणकापर्यंत लेखनाची माध्यमे काळानुसार बदलली असली तरी लेखन या गोष्टीचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना ते दिवसेंदिवस वाढतेच आहे. ज्ञानशाखा आणि तंत्रज्ञानाच्या विस्ताराबरोबर मूलभूत मांडणीपासून दस्तऐवजीकरणापर्यंत ते वाढतच जाणार आहे. म्हणूनच हे लेखन अधिक नेमके, उठावदार, शुद्ध आणि स्पष्ट व्हायला हवे असेल तर त्यासाठी इतर कौशल्यांचाही कौशल्यपूर्ण उपयोग गरजेचा असतो. साक्षेपी संपादन, बिनचूक शुद्धलेखन आणि काटेकोर मुद्रितशोधन हीच ती कौशल्ये…आशयसंपन्न लेखनाला अधिक सुशोभित करणारी ! लेखनाला व्याकरणदृष्ट्याही बिनचूक बनविणारी ! माध्यमे वाढली तशी ही कौशल्ये लीलया वापरणा-या कुशल मनुष्यबळाचीही गरज वाढते आहे. या क्षेत्रात अर्थार्जनाच्या असंख्य संधी उपलब्ध असताना आणि व्यक्त होण्याची ऊर्मी असंख्य मनांमध्ये दाटलेली असताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी घेऊन येत आहे ही अनोखी ऑनलाईन कार्यशाळा… तुम्हाला लेखनासाठी अधिक सुसज्ज आणि संपन्न बनविणारी ! संपादन, शुद्धलेखन आणि मुद्रितशोधन या कौशल्यविकासाच्या वाटा सुस्पष्ट करणारी !

Learning objectives:

  1. शुद्धलेखनाची गरज-महत्त्व आणि वर्तमान नियम
  2. संपादन आणि मुद्रितशोधन म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व
  3. संपादन आणि मुद्रितशोधनाची चिन्हे / खुणा
  4. संपादक-मुद्रितशोधकाचा व्यक्तिमत्त्व विकास
  5. संपादक-मुद्रितशोधकाची भूमिका आणि जबाबदारी
  6. संपादन-मुद्रितशोधनातील व्यावसायिक संधी

Who can attend

अध्यापक वर्ग, संपादक, मुद्रित शोधक, लेखक, आशय लेखक, अहवाल लेखनाचे काम करणारे, तसेच पत्रकार, माध्यम क्षेत्रात काम करणारे, समाजमाध्यमांवरील लेखक, ब्लॉग लेखक, शासकीय मजकूर लेखक सर्व प्रकारचे लेखन करणारे आणि या क्षेत्राची आवड असणा-या सर्वांसाठी

Programme Dates: 20-21 February 2021

Session : 10:30 am to 4:00 pm

Batch Size

40-50

Medium:

मराठी

Fee Details

रु. 850/- (जी.एस.टी.सह) प्रत्येकी

Resource Persons

  • प्रा. यास्मिन शेख
  • डॉ. अविनाश पंडित
  • आरती घारे

संपादन, शुद्धलेखन आणि मुद्रितशोधन

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

राहुल टोकेकर (9222291079) rahult@rmponweb.org
संतोष गोगले (9226448481) santoshg@rmponweb.org