सार्वजनिक कार्यक्रमांना आपल्या सांस्कृतिक संचिताच्या संदर्भात आणि समाज – जीवनात एक विशिष्ट स्थान आहे. केवळ शहरातच नव्हे तर छोट्या – छोट्या गावांमधूनही सार्वजनिक कार्यक्रम योजण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. समाजाची विचारशक्ती, प्रतिभा, समज आणि जाण यांचे प्रतिबिंब म्हणजे आपले सार्वजनिक कार्यक्रम. सामाजिक संस्थांना विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी आखावे लागतातच. या कार्यक्रमांमधूनच संस्थेची प्रतिमा निर्माण होत असते. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांचे यशापयश केवळ लोकसहभागावर अवलंबून नसते, तर आखीव – रेखीव संयोजन, नीटनेटक्या व्यवस्था, उत्कृष्ट असे सूत्रसंचालन याही गोष्टी विलक्षण महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच कार्यक्रमाचे संयोजन व त्याचे संचालन यामागचे शास्त्र समजून घेतले तर कार्यक्रम हा अधिक आकर्षक, नीटनेटका होतो. संस्थेच्या वाटचालीत या विषयाला फार महत्त्व आहे. याच उद्देशाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ‘कार्यक्रम संयोजन’ या विषयावर रविवार, दि. २७ फेबुवारी २०२२ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Learning objectives:
- कार्यक्रम संयोजनाची पूर्व तयारी
- कार्यक्रम पूर्व प्रचार आणि प्रसिद्धी
- कार्यक्रमाचे प्रत्यक्ष नियोजन आणि मंच व्यवस्थापन
- कार्यक्रमाचे प्रकार
- निवेदन व सूत्रसंचालन
- कार्यक्रमाचा पाठपुरावा
Who can attend
सर्वांसाठी
Programme Dates: 27 February 2022 (Sunday)
Session Plan: 10.00 am – 05:00 pm
Batch Size
४०
Medium:
मराठी
Fee Details
रु. १०००/- (जी.एस.टी. सहित) (चहापान, भोजन, प्रशिक्षण साहित्यासहित)
Resource persons
सुप्रसिद्ध कार्यक्रम व्यवस्थापक, सूत्रसंचालक
आनंद क्षेमकल्याणी
मनीषा क्षेमकल्याणी
Programme Coordinator(s)
कार्यक्रमासंबंधित अधिक माहितीसाठी
Gandhar Bhandari, 8851366407, gandharb@rmponweb.org
Dilip Navele, 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal, 9975415922, anilp@rmponweb.org
BATCH I : Report of कार्यक्रम संयोजन प्रशिक्षण शिबिर
कार्यक्रम संयोजन का करावे ? या विषयाने सुप्रसिध्द कार्यक्रम संयोजन तज्ञ मा. विद्याधर निमकर यांनी या शिबिराचे उदघाटन केले. कार्यक्रम आयोजन, नियोजन, प्रयोजन आणि शेवटी संयोजन या चार टप्प्यांच्या पैलूंवर भर देत एखादा कार्यक्रम निटनेटका, आखिव-रेखीव झाल्यास आपल्याला काय मिळते ? तर अश्या सुनियोजित कार्यक्रम संयोजनातून आपल्याला व आपल्या सहका-यांना आनंद व समाधान मिळते. त्याचबरोबर संस्थेची प्रतिमा उंचावते असे मनोगत मा. विद्याधर निमकर यांनी व्यक्त केले. दि. ९-१०-११ जून २०२० या कालावधीत प्रथमच घेण्यात आलेल्या ‘कार्यक्रम संयोजन’ या ऑनलाईन तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एकूण सहा विषयांवर सुप्रसिध्द कार्यक्रम व्यवस्थापक व सूत्र संचालक आनंद क्षेमकल्याणी व मनीषा क्षेमकल्याणी यांनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही कार्यक्रमाचे संयोजन, नियोजन आणि आयोजन चोख करण्यासाठी त्याची पूर्वतयारी करणे गरजेचे असून त्या कार्यक्रमाचा हेतू समजून घेतला पाहिजे. कार्यक्रम कशासाठी ? कोणासाठी ? करणार आहोत, त्यातून आपल्याला काय साध्य करावयाचे आहे या मुद्यांवर विश्लेषण केले. कार्यक्रम उत्तम प्रकारे होण्यासाठी त्या कार्यक्रमातील संबंधीत सर्व व्यक्तींनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. कार्यक्रमाचे बारकावे तपासले पाहिजेत. या क्षेत्रात कितीही अनुभवी असलो तरी नवीन कार्यक्रमात येणा-या अडीअडचणींना सहज सामोरे जाता आले पाहिजे. कार्यक्रम संबंधीत व्यक्तींचा नियमीत संपर्क व त्या संबधीत बैठका होणे गरजेचे असते.
बघुया… होईल… होवून जाईल अशा दृष्टीने कोणत्याही कार्यक्रमाकडे पाहू नका. कोणताही कार्यक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर हे आपल्यासाठी नवीनचं आहे हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवले पाहिजे असे म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी समारोप सत्रात आपले विचार व्यक्त केले. प्रबोधिनीने ऑनलाईन आयोजीत केलेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्रातून २५ प्रतिनीधींनी (महिला, पुरुष) भाग घेतला. सर्व प्रतिनीधिंना ई-प्रमाणपत्र देण्यात येवून प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले यांनी मा. आनंद क्षेमकल्याणी व मनीषा क्षेमकल्याणी व सर्व प्रतिनीधिंचे आभार मानले.