लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील जनजीवन सुखकर करण्यासाठी अखंड प्रयत्नशील असतो. त्याच्या प्रयत्नातून मतदारसंघाची बांधणी होत असतेच, पण त्यांचीही कार्यतत्पर प्रतिमा निर्माण होत असते. या प्रयत्नात त्यांच्या स्वीय साहाय्यकांची पडद्याआड अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. आज सर्व जग कोरोना संकटाशी सामना करत असताना भारत सरकारने देशातील सामान्य जनतेचे जीवन सुखकर व्हावे यासाठी वीस लाख कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या आहेत. अशाच हेतूने आधीपासून आणलेल्या अन्य योजना आहेतच. या सगळ्या योजना नीट समजून घेऊन जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेणे अशा विविध गोष्टीत स्वीय साहाय्यकाने लक्ष घालण्याची आवश्यकता असते. या प्रयत्नातून आपल्या लोकप्रतिनिधींचा जनसंपर्क विस्तारण्यात आणि त्यांची कार्यतत्पर व लोकनेता अशी ओळख निर्माण करण्यात लाभ मिळतो.

Learning objectives:

या कार्यशाळेत पुढील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल

  • सद्यस्थिती व केंद्र सरकारने केलेल्या उपाय योजना यांची माहिती.
  • सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठीच्या योजना व पाठ पुराव्याची पध्दत
  •  शेती, अन्न प्रक्रिया, पणन या विषयातील योजना व पाठपुरावा
  • रोजगार हमी योजना, स्थलांतरित मजूरांसाठीच्या योजना व पाठपुरावा
  •  विविध प्रकारच्या पेन्शन योजना व पाठपुरावा
  • मोफत वितरणाच्या योजना व पाठपुरावा
  • सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी योजना, मुद्रा तसेच इतर योजना व पाठपुरावा
  • बचत गटांसाठी असलेल्या योजना, त्यासाठी सहकार्य व पाठपुरावा
  • आरोग्यविषयक योजना व पाठपुरावा
  •  वरील सर्व कामांसाठी करावयची पूर्वतयारी, नोंदी, कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रसिद्धी

Who can attend

भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या स्वीय साहाय्यकांसाठी

Programme Dates: 16-18 August 2020

Session Plan: 3 days with 2 classes a day

Session 1 – 10:30 am -11:30 am
Session 2 – 12:30 pm -01:30 pm or 03:30 pm – 04:30 pm

Batch Size

25-30

Fee Details

रु.1250/-प्रति व्यक्ती(जी.एस.टी. सहित)

लोक कल्याणकारी योजना आणि लोकप्रतिनिधींच्या स्वीय साहाय्यकांची भूमिका (ऑनलाईन) कार्यशाळा

 

Verification

 

Medium:

मराठी

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले, 9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org

BATCH I : Report of लोक कल्याणकारी योजना आणि लोकप्रतिनिधींच्या स्वीय साहाय्यकांची भूमिका (ऑनलाईन) कार्यशाळा

होय आम्ही हे करु शकतो…

आज सर्व जग कोरोना संकटाशी सामना करत असताना भारत सरकारने देशातील सामान्य जनतेचे जीवन सुखकर व्हावे यासाठी वीस लाख कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या आहेत. अशाचं प्रकारे आधीपासून आणलेल्या अन्य योजना आहेतच. या सर्व योजना निट समजून घेवून जनते पर्यंत पोहचविणे, त्या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणे याच उद्देशाने दिनांक १६ ते १८ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण वर्गात भारतीय जनता पार्टी आमदारांच्या स्वीय साहाय्यकांसहित या विषयात रुची असणा-या अन्य प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. एकूण २८ प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले. व प्रशिक्षणामागची भूमिका प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी मांडली. या वेळी प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य विवेक अत्रे उपस्थित होते. भारताने नेहमी लघुउद्योगांवर भर दिला आहे. भारत हा नेहमी विश्वगुरूच्या भूमिकेत राहिला आहे. सरकारे योजना जाहीर करत असतात पण योजनांची अंमलबजावणी होत नसेल तर त्या कागदावरच राहतात. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे  काम आपण केले पाहिजे त्यासाठी लागणा-या प्रशिक्षणाची सोय सरकार प्रमाणे लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे. असे मत चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

शासकीय योजना, सर्वसामान्य नागरीकांसाठींच्या योजना, शेतीपुरक योजना, अन्न प्रक्रिया, विपणन विषयक योजना, रोजगार हमी योजना, सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी योजना, मुद्रा योजना, विमा योजना आणि आरोग्य विषयक योजना इत्यादी योजनांवर मा. माधव भांडारी, विनायक आंबेकर, डॉ. अनिल बोंडे, प्रदीप पेशकार, चित्रा वाघ, डॉ. श्रीराम सावरीकर आणि विवेक अत्रे यांनी मार्गदर्शन केले. कोवीड-१९ काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर जसे परिणाम झाले त्याच प्रमाणे छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यावर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद संस्था राबवित असलेल्या योजनांची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. बचतगटांसाठी असणा-या योजना राबविणे व कष्टकरी महिलांना सक्षम बनवून त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यात येत असून महिला आता आपले अधिकार ओळखून बचत गटांमार्फत सजग व आर्थिकदृष्ट्या मजबूत बनत आहेत.

केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनांची माहिती देताना ग्रामीण व शहरी भागातील योजनांचा अभ्यास करुन त्या योजना राबविणा-या संबंधीत व्यक्ति, संस्था किंवा महामंडळांकडून माहिती व प्रशिक्षण घेतले पाहिजे. योग्य त्या यंत्रणांमार्फत या योजना पोहचविण्याचे काम आपण केले पाहिजे. त्या योजनांचा पाठपूरावा करुन त्या अंमलात आणल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या योजना कोण राबवित आहे, त्यापेक्षा त्या कशाप्रकारे राबविल्या जात आहेत याला महत्त्व दिले पाहिजे. एक जिल्हा एक क्लस्टर निर्माण करुन प्रत्येक हाताला काम दिले पाहिजे. प्रशिक्षणात उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रतिनीधीने आपल्या विभागात, जिल्ह्यात योग्य त्या योजनेचा सखोल अभ्यास करुन फक्त एक योजना उत्तमरित्या राबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

कोणत्याही योजना या लोककल्याणासाठीच असतात. त्यामुळे योजनांची व्यवस्थित माहिती घेवून, योग्य नियोजन, सूत्रबद्ध मांडणी करुन योजना राबविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणा-या संस्थांचीही मदत घेतली पाहिजे. असे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी आपले विचार मांडले. समारोप प्रसंगी प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य विवेक अत्रे उपस्थित होते. शेवटी सर्व प्रतिनीधिंना या प्रशिक्षणाचे ई-प्रमाणपत्र देण्यात आले. प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले यांनी समारोप सत्राचे संचालन केले, तर अनिल पांचाळ, कार्यक्रम समन्वयक यांनी सर्वांचे आभार मानले. वंदेमातरम म्हणून हे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.