लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग

Learning objectives:

विषय सूची:

  • लोकमान्यांचे भारतीय राजकारणातील योगदान
  • स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि स्वा.सावरकर
  • लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक
  • लोकमान्यांचे गीतारहस्य
  • लोकमान्य टिळकांचे अर्थकारण
  • लोकमान्य टिळकांच्या आठवणी
  • कायदेपंडित लोकमान्य टिळक
  • लोकमान्य टिळकांनी योजलेले सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम

Who can attend

अपेक्षित सहभागी : १८ वर्षावरील कोणीही इच्छुक व्यक्ती

Programme Dates: 1-4 August 2020

Session Plan: 4 days with 2 classes a day

Session 1 – 11:00 am -12:00 pm
Session 2 – 04:00 pm – 05:00 pm

Batch Size

30-40

Fee Details

रु.500/-प्रति व्यक्ती(जी.एस.टी. सहित)

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Medium:

मराठी

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org
उत्तम पवार, 8108024609, savarkarmovie@hotmail.com
शैलेश गोखले, 8108955966, shaileshg@rmponweb.org

BATCH I : Report of लोकमान्य टिळक : जीवन आणि कार्य

कार्यक्रम अहवाल 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक : जीवन आणि कार्य’ ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. १ ते ४ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आले होते.  या प्रशिक्षण वर्गात परदेशासहीत (मस्कत) व दोन राज्यातून १४ जिल्ह्यातील ५८ प्रतिनिधी (महिला व पुरूष) सहभागी झाले होते.

ज्येष्ठ लेखक, प्रवचनकार, नाटककार, कवी, इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन  झाले. प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी अभ्यासक्रमामागची भूमिका सर्वांसमोर मांडली. त्याचबरोबर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष मा. विनोद पवार आणि डॉ. अशोकराव मोडक उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण वर्गात लोकमान्यांचे भारतीय राजकारणातील योगदान, लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक, लोकमान्यांचे गीता रहस्य, टिळकांचे प्राच्यविद्या संशोधन, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर, लोकमान्य टिळकांचे अर्थकारण, लोकमान्यांच्या आठवणी, कायदेपंडित लोकमान्य टिळक व टिळकांनी योजलेले सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम अशा एकूण नऊ विषयांची  मा. अरविंद कुळकर्णी, प्रा. अविनाश कोल्हे, डॉ. मुकुंद दातार, डॉ. प्रमोद पाठक, डॉ. अशोकराव मोडक, चंद्रशेखर टिळक, पार्थ बावस्कर, आणि विकास परांजपे यांनी  मांडणी केली.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ख्यातनाम आहेत. लोकमान्य टिळक क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय सेनानी देखील होत. ब्रिटीश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत. लोकांनी मान्य केलेले म्हणून लोकमान्य.

लोकमान्य यांची आक्रमकता आणि सरकारला थेट भिडण्याची वृत्ती हे गुण अवगत होते. गीता पून्हा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी  टिळकांनी अहोरात्र प्रयत्न केले. विवेकानंद व लोकमान्य यांचे स्वातंत्र्योत्तर भारताबद्दलचे  चिंतन एकाच दिशेने जाणारे होते. सावरकरांनी जी क्रांती केली तिची पायाभरणी लोकमान्यांनीचं केली. लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद भारतीय इतिहासातील दोन दिग्गज होत.

१८८० ते १९२० या कालावधीतील लोकमान्य टिळकांच्या कार्याची माहिती उत्तमरित्या सर्वांनी आपआपल्या विषयात मांडली. रामायण आणि महाभारत संपूर्ण आत्मसात करणारे टिळक होत. टिळकांनी लिहिलेल्या व टिळकांवर  लिहिलेल्या अनेक ग्रंथांचा संदर्भ देवून विवेचनात्मक स्मृतिंना उजाळा दिला.

अभ्यासक्रमाच्या समारोप सत्रात सहभागींनी आपले अभिप्राय व्यक्त केले. प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी सर्व प्रतिनिधींचे अभिप्राय जाणून घेवून आपले मनोगत व्यक्त केले.  डॉ. अशोकराव मोडक यांनी समारोपप्रसंगी आपले विचार मांडले. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेवटी सर्व प्रतिनिधींना  प्रमाण पत्र देण्यात आली.

सहभागीप्रतिनिधी आणि समारोप सत्रातील मान्यवरांचे प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले यांनी आभार प्रकट करून या चार दिवसीय अभ्यासक्रमाची सांगता वंदेमातरम राष्ट्रगीताने  झाली.

प्रशिक्षणातील काही निवडक प्रतिक्रिया :

एखाद्या क्रांतीकारकाची फारशी माहिती नसलेल्या लोकांनाही क्रांतिकारकांच्या चरित्रांचे वाचन करुन क्रांतीकारक समजून घेण्याची प्रेरणा मिळाली.

क्रांतीकारकांचा इतिहास पुन्हा तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न झाला पाहीजे.