आमदारांचे स्वीय साहाय्यक जितके सक्षम असतील तेवढे आमदारांना त्यांचे काम सक्षमपणे करण्यास पूरक ठरते. त्यामुळेच स्वीय साहाय्यकांना त्यांच्या कामाच्या दृष्टीने, सक्षम होण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. आजपर्यंत सुमारे ५०० हून अधिक स्वीय साहाय्यकांनी या अभ्यासक्रमात सहभाग घेतला आहे.
Learning objectives:
आमदारांच्या स्वीय साहाय्यकाने संबंधित कामकाजाची अधिक माहिती घेऊन आपले कामकाज अधिक व्यापक स्वरूपात व नियोजनबद्ध करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराची रचना करण्यात आली आहे.
Who can attend
आमदारांच्या स्वीय साहाय्यकांसाठी
Programme Dates: 22-26 June 2020
Session Plan (पाच दिवस)
Session 1 – 10.30 am – 11.30 am
Session 2 – 12.30 pm – 01.30 pm
Batch Size
३५-४० अपेक्षित संख्या
Medium:
मराठी
Fee Details
₹ 800/-
Programme Coordinator(s)
For any query on this course please contact
दिलीप नवेले, dilipn@rmponweb.org, 9967429456
अनिल पांचाळ, anilp@rmponweb.org, 9975415922
BATCH I : Report of Training for PA of BJP MLAs
रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनिच्यावतीने दि. २३ – २७ मे २०२० या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ सदस्यांच्या स्वीय साहाय्यकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग योजण्यात आला होता. या वर्गात १९ आमदारांचे ३९ स्वीय साहाय्यक सह्भागी झाले होते. या प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केले तर उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्वीय साहाय्यकाकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या. तसेच स्वीय साहाय्यकाने काय करावे व काय टाळावे हे सर्वांसमोर मांडले. भारतीय जनता पार्टीची जनसंघापासूनची वाटचाल जनसंघ ते भाजपा : इतिहास विकास या सत्रात प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सह्भागींसमोर मांडली. भाजपाचे राजकारणातील वेगळेपण त्यांनी सर्वांना सोप्या शब्दात सांगितले.
भारतीय जनता पार्टीची वा आधीच्या जनसंघाची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून झाली आणि अशा अनेक विविध क्षेत्रात संघाच्या प्रेरणेतून संस्था / संघटना स्थापन झाल्या आहेत. या सर्वांचा मिळून जो विचार परिवार निर्माण झाला आहे त्याचे विवेचन रवींद्र साठे यांनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विचार परिवार या सत्रात केले. स्वीय साहाय्यकाची नेमकी भूमिका काय ? याबद्दल विशाखा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्वीय साहाय्यक जितका तत्पर आणि अभ्यासू असेल तितके आमदाराचे कार्य प्रभावी होण्यात उपयुक्त ठरते. मात्र आपण आमदारांचे स्वीय साहाय्यक आहोत याचे भान ठेवणेही आवश्यक आहे. आमदार कार्यालयाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही स्वीय साहाय्यकाने नीट पार पाडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यालयात येणाऱ्यांशी आपला व्यवहार, कार्यालयात आवश्यक गोष्टी, पत्रव्यवहार अशा सर्व अंगाने योग्य व्यवस्थापन केले गेले तर आमदारांची योग्य प्रतिमा तयार होण्यात याची मदत होते हे त्यांनी सोदाहरण सह्भागीना सांगितले. आमदारांना ज्या दोन गोष्टी अनिवार्यपणे कराव्याच लागतात व यामध्ये स्वीय साहाय्यकाला व्यवस्थित लक्ष द्यावे लागते ते म्हणजे सभागृह कामकाजातील सहभाग व आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी सरकारी योजना व आमदार निधीचा वापर.
सभागृह कामकाजाबाबत माजी मंत्री आ. योगेश सागर यांनी सह्भागीना मार्गदर्शन केले. सभागृह संचालनासाठी असणाऱ्या विविध नियम / तरतूदी त्यांनी सर्वांसमोर ठेवल्या तसेच नियमावलीचे पुस्तक आपापल्या कार्यालयात कायमस्वरूपी असावे असा आग्रह सर्व सह्भागींना केला. आमदार निधी वापराचे नियम / निकष आणि आपल्या मतदार संघाची आवश्यकता याची योग्य जान ठेवल्यास या निधीचा प्रभावी उपयोग करता येवू शकतो तसेच विविध सरकारी योजनांपैकी नेमक्या कोणत्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे या दृष्टीने स्वीय साहाय्यक आमदाराचे काम सुलभ करू शकतो. स्वीय साहाय्यकाच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आवश्यकता लक्षात घेत रवींद्र साठे यांनी या विषयाचे महत्त्व व त्या अनुषंगाने विविध पैलू सर्वांसमोर ठेवले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध साधने आपल्या कामाला सहज करण्यासाठी उपलब्ध होत आहेत. समाज माध्यम आज अत्यंत प्रभावी साधन आहे. त्यामुळे हे साधन समजून घेवून आपले कार्य परिणामकारक करणे व त्याची योग्य प्रसिद्धी करण्यासाठी कसा उपयोग करावयाचा याबाबत प्रबोधिनीचे अधिकारी देवेंद्र पै यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण वर्गाचा समारोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाने झाला. अशा विषयाचा वर्ग होणे किती आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले तसेच आमदाराच्या यशस्वी वाटचालीत स्वीय साहाय्यकाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितले. मात्र आपण कितीही कार्यक्षम असलो तरी ही कार्यक्षमता आमदाराच्या कार्य प्रसिद्धी व प्रतिमा निर्मितीसाठी आहे याच भान ठेवण्याच आवाहन त्यांनी सर्वांना केलं.