आज कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग भीषण संकटात सापडले आहे. याचा मानवी जीवनावर काय परिणाम होणार याबाबत काही प्रमाणात कल्पना येतेय तर काही परिणाम अजूनही कळावयाचे आहेत. सामाजिक संस्थाना तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतानाच कोरोनाची त्यात भर पडली आहे. या संकटामुळे अनेक संस्थांसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. या परिस्थितीत येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. कदाचित देशी / विदेशी निधीचा स्त्रोत मर्यादित होईल वा निधी देण्याचे प्राधान्यक्रम बदलतील.

Learning objectives:

या परिस्थितीत स्वयंसेवी संस्थांनी आपल्या प्राधान्याच्या
विषयांमध्ये बदल करावे लागतील का ? कामाचे स्वरूप बदलावे लागेल का ?
असे अनेक प्रश्न स्वयंसेवी संस्थांसमोर आहेत. आता असलेला निधी कायम राहील का ?
नवीन कोणते प्रकल्प हाती घ्यावे लागतील ते कसे लिहावे लागतील व त्यासाठी कोणत्या
निधी दात्या संस्था मदत करतील असे प्रश्न आहेत.

Who can attend

स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी

Programme Dates: 29 June - 03 July 2020

Session Plan: 5 days with 3 classes a day

Session 1 – 10.30 am – 11.30 am
Session 2 – 12:30 pm – 01.30 pm
Session 3 – 03:30 pm – 04.30 pm

Batch Size

३५-४०

Medium

मराठी

Fee Details

₹1000/- प्रति व्यक्ती (जी.एस.टी.सहित)

बदलत्या परिस्थितीत संस्थांसमोरील आव्हाने व उपाय या विषयावर कार्यशाळा

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले, 9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org

BATCH I : बदलत्या परिस्थितीत संस्थांसमोरील आव्हाने व उपाय या विषयावर कार्यशाळा

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दि. २९ जून ते ३ जुलै २०२० या कालावधीत ‘बदलत्या परिस्थितीत संस्थांसमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर ५ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील २४ सामाजिक संस्थांचे ३० प्रतिनिधी (महिला व पुरुष) या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेत विविध विषयांवर १४ सत्र व समारोपाचे एक मिळून एकूण १५ सत्र झाली. कोविड-१९मुळे जगभरात उत्पन्न झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीबाबतची अनिश्चितता लक्षात घेवून हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आजची परिस्थिती पाहता अशा प्रकारच्या कार्यशाळेची आवश्यकता असल्यामुळेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र संस्थांसमोरील आव्हाने इतकी मोठी आहेत की, सर्वांनी एकमेकांशी सहकार्य करूनच पुढे जावे लागेल असे म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनपर मार्गदर्शनात आग्रहाने सांगितले.

प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य आणि गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात सक्रीय असणारे श्रीराम पटवर्धन यांनी येणाऱ्या काळातील आव्हानांचा उहापोह केला. येणाऱ्या काळात विविध स्तरावरचे नाते संबंध, आर्थिक व्यवस्थापन, कामाचे प्राधान्यक्रम ठरविणे अशा विविध अंगानी विचार करून यासाठी संस्थांनी आपल्या कार्यशैलीत आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात संबंधित सर्वांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग, सर्वांना विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. प्रबोधीनिच्याच सर्वसाधारण समितीचे सदस्य आणि सामाजिक संस्थांचे मार्गदर्शक विवेक अत्रे यांनी सहभागी प्रतिनीधींना मार्गदर्शन करताना देशभर अचानकपणे लॉकडाऊन घोषित करावा लागल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उभ्या राहिलेल्या विविध क्षेत्रातील समस्या त्यांनी मांडल्या. शेती साठी मजूर न मिळणे, शिक्षण क्षेत्रात परीक्षा होवू न शकणे अशा काही समस्यांचा त्यांनी उल्लेख केला. मात्र त्याचबरोबर नकळतपणे उभे राहिलेले उपाय आणि येणाऱ्या काळात नेमके कोणते उपाय केले पाहिजेत हेही त्यांनी सहभागी प्रतिनीधींना समजावून सांगितले. आपल्या संस्थेचे कार्य लोकांपर्यंत नीट पोहोचवले पाहिजे आणि त्याचा एक मार्ग म्हणजे आपला वार्षिक कार्य अहवाल वेळेत तयार करून लोकाना मिळेल याचे योग्य नियोजन केल्यास आपल्या अनेक अडचणींना दूर करण्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य आपल्याला मिळणे सहज सोपे होईल हे महत्त्वाचे सूत्र सर्वांसमोर ठेवले. त्याचप्रमाणे विविध आव्हानांचा प्रतिवाद करण्यासाठी उपलब्ध असणा-या सरकारी योजना, निधी पुरवणाऱ्या विविध संस्था आणि हे सर्व प्राप्त करण्यासाठी संस्थांनी प्रकल्प प्रस्ताव कसे तयार करावेत, त्याला पूरक अशी लागणारी कोणती कागद पत्रे जोडावीत या अनुषंगाने मार्गदर्शन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असणा-या डॉ. प्रसाद देवधर यांनी कौशल्याधारित उद्योग व गाव, जिल्हापातळीवरील सामूहिक उद्योग या दोन विषयांवर मार्गदर्शन केले. शेतीची उत्पादकता वाढविणे, सद्या उदभवलेल्या भयंकर करणीपरिस्थितीत गावातच राहण्याच्या मानसिकतेतून आलेला चाकरमानी अर्थात आवश्यक मनुष्यबळ याचा योग्य समन्वय साधताना मी शेतकरी आहे ही भावना जागृत करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. तसेच त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून घरटी ५ कोंबड्या, त्यांचे खाद्य आणि मार्गदर्शन या आधारे जिल्ह्यातील सकस अंड्यांचे रास्त दरातील उत्पादन वाढवून जिल्हा या बाबत स्वयंपूर्ण व रोजगारक्षम करण्याचा त्यांनी केलेला प्रयोग सर्वांसमोर मांडला.

याच अनुषंगाने मग औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढारे यांनी वैद्यकीय क्षेत्रासमोर आता उभी राहिलेली आव्हाने उदा. चिकित्सा पद्धत , अन्य रुग्ण तपासणी करणे बंद होणे, वैद्यकीय खर्चात झालेली भरमसाठ वाढ अशा बाबी सर्वांसमोर मांडताना यासाठी सद्य परिस्थितीत करण्यात येत असलेले उपाय तसेच या सर्व समस्यांवर दीर्घकालीन मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. शिक्षणाच्या क्षेत्रातील आव्हाने क्वेस्ट संस्थेची स्थापना करून या क्षेत्रात विविध प्रयोग करणारे व प्राधान्याने शिक्षक क्षमता विकासात अधिक प्रयत्न करणारे निखील निमकर यांनी सर्वांसमोर ठेवली. ग्रामीण भागात ऑनलाईन शाळा सुरु करताना त्याची उपलब्धता आणि त्या भागात येणाऱ्या अडचणींपासून ते अन्य आव्हानांचा उहापोह करताना ते स्वत: या क्षेत्रात करत असलेले उपाय व संभाव्य उपाय या बद्दल माहिती दिली.

ग्रामीण क्षेत्रातील आणि त्यातही निरक्षर वा कमी शिकलेल्या महिलांच्या सक्षमीकारणासाठी उपयुक्त बचत गट या परिस्थितीत अपवाद कसे ठरतील? सोलापूर मध्ये उद्योगवर्धीनी संस्थेची स्थापना करून अशा महिलांच्या सक्षमीकरणात २ दशकांहून अधिक काळ सक्रीय असणाऱ्या चंद्रिका चौहान यांनी बचत गट संबंधित मार्गदर्शन केले. शेती कोणती करावी, काय उत्पन्न घ्यावे, त्याचे विपणन, शेती पूरक व्यवसाय कोणते करता येतील, याचा विचार शेतक-यांनी केला पाहिजे अशी मांडणी शेती क्षेत्राचे अभ्यासक आणि २५ वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात सक्रीय असणारे धनंजय गोळम यांनी केली. एड्सग्रस्त महिला, देहविक्रय व्यवसायातून अडचणीत आलेल्या महिला आणि त्यांची मुले यांच्या आरोग्य, रोजगार अर्थात पुनर्वसनाचे स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात कार्य करणारे डॉ. गिरीश कुळकर्णी यांनी महिला-बाल क्षेत्रासमोर उभी राहिलेली आव्हाने आणि तात्कालिक व दीर्घकालीन उपाय सर्वांसमोर ठेवले.
पाणी आणि स्वच्छता यापुरतचं मर्यादित न राहता ग्रामविकास, जलव्यवस्थापन आणि वृक्षलागवड यावर लक्ष केंद्रीत करुन ग्रामीण क्षेत्रात रोजगार उत्पन्न करण्यासाठी विविध उपाय योजना आखून रोजगार निर्मिती केली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात जल साक्षरता व प्रत्यक्ष उपाय अमलात आणून आपल्या दुष्काळग्रस्त गावाला जल स्वावलंबी ज्यांनी बनवले असे हिवरेबाजारचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळा संपन्न झाली.