संस्था… मग ती सामाजिक असो वा शैक्षणिक… आपल्या कामाची व्याप्ती वाढवायची असेल तर गरज असते ती प्रसिद्धीची ! सध्याच्या काळात ठोस विधायक कार्याला प्रसिद्धीची जोड देणं ही अत्यावश्यक बाब बनली आहे. नव्हे, ती यशाची गुरुकिल्लीच म्हणावी लागेल. पण त्यासाठी आवश्यकता असते योग्य दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) आणि त्याच्या सुयोग्य सादरीकरणा (प्रेझेंटेशन) ची !
संस्थेचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेच्या सविस्तर आकर्षक परिचयाबरोबरच ब्रोशर्स, अहवाल, यांचीही जोड द्यावी लागते. वेबसाईट सारख्या अत्याधुनिक माध्यमांचा उपयोग करतानाच फेसबुक, लिंक्डइन, अशा समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करता येतो. पण यासाठी नेमकं लिहायचं कसं?
अनेकांना नेहमी सतावणा-या या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत, एक अत्यंत उपयुक्त कार्यशाळा… प्रसिद्धी साहित्य तयार करण्यासाठीच्या आशय लेखनाची ! लेखणीच्या माध्यमातून संस्था नावारुपाला आणणारी, संस्थेचा स्वतंत्र ब्रॅंड तयार करणारी एक आगळीवेगळी, उपयुक्त कार्यशाळा !