संस्थात्मक पातळीवर कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर गरज असते निधीची ! तो कसा मिळवायचा, हा वर्षानुवर्षांचा संस्थांचा यक्षप्रश्न. पण गेल्या काही वर्षात त्यासाठीचा एकराजमार्ग म्हणता येईल असा निर्माण झालेला स्रोत म्हणजे कंपन्यांचा CSR निधी ! हा निधी मिळवायचा असेल तर त्यासाठी तितक्याच ताकदीनं प्रकल्प प्रस्तावही तयार करता यायला हवा.तो कसा करायचा नि त्यातून निधी मिळवायचा कसा, याचे सनदशीर नि हमखास यशाचे मार्ग खुले करणारी ही कार्यशाळा !

कोरोनानंतरच्या काळात कंपन्यांकडे निधी उपलब्ध आहे का, या विषयीचे कायदे काय सांगतात, प्रकल्प प्रस्ताव लेखनाचे नेमके तंत्र काय, इत्यादी अनेक प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळविण्यासाठी या संवादात्मक चार दिवसीय कार्यशाळेत आजच नाव नोंदवा. आणि तुम्हीच करा तुमचा प्रकल्प प्रस्ताव तयार !…

कार्यशाळेतील विषय:

१) प्रकल्प प्रस्ताव लेखन गरज, महत्त्व आणि उपयोग.
२) प्रकल्प प्रस्ताव – अहवाल लेखन आणि प्रकल्प शाश्वतता
३) प्रकल्प संनियंत्रण, मूल्यमापन, परिणामांचे मूल्यमापन
४) स्वयंसेवी संस्था आणि निधी देणार्‍या संस्था यांच्यातील समन्वय
५) निधी मिळविण्याचे विविध मार्ग, संस्थांकडून अपेक्षा
६) प्रकल्प प्रस्ताव लेखन – कृतिसराव

या कार्यशाळेला कोणी नाव नोंदवावे ?

सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, CSR समन्वयक,

कार्यक्रम दिनांक: २२-२३-२४-२५ जुलै २०२१

वेळ: सकाळी १० ते ४

अपेक्षित सहभागी संख्या:

७०

माध्यम:

मराठी

शुल्क:

रु.१२००/- प्रत्येकी (जी.एस.टी.सह)

स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखन (ऑनलाईन कार्यशाळा)

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

संतोष गोगले (९२२६४४८४८१) ; santoshg@rmponweb.org
राहुल टोकेकर (९८२२९७१०७९) ; rahult@rmponweb.org