स्वयंसेवी संस्थांनी १२ अ आणि ८० जी या कलमाखाली पुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया व परकीय निधी नियमन कायदा यातले बदल गेल्या अंदाजपत्रकात स्वयंसेवी संस्थांना दिल्या जाणाऱ्या आयकर सवलती बाबतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत हे बदल नीट समजावून न घेतल्यास या सवलतींना संस्थांना मुकावे लागेल व त्याचे दूरगामी परिणाम संस्थेच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतात. या विषयाची नीट माहिती व्हावी व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा नोंदणी कशी करावी व या निमित्ताने वाढलेल्या आर्थिक व हिशोब विषयक पूर्तता यांची माहिती संस्थांना होणे अत्यंत आवश्यक आहे.सोबतच परकीय निधी नियमन कायदा १९७६ या मध्ये देखील बरेच बदल झाले आहेत, नोंदणी पासून ते विविध प्रकारच्या पूर्तता व त्या करायची पद्धत या विषयी अद्ययावत माहिती संस्थांना असणे गरजेचे आहे. या नंतरच्या काळात स्वयंसेवी संस्थांना आर्थिक व इतर सर्वच बाबतीत अत्यंत काटेकोर आणि तत्पर राहावे लागणार आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सामाजिक संस्थासाठी आर्थिक कायदे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.

Learning objectives:

  1. स्वयंसेवी संस्थांना लागणारी अत्यावश्यक आर्थिक नोंदणी पत्रके व त्याचे महत्त्व
  2. वरील कागदपत्रे तयार करतांना व त्याच्या नोंदी ठेवतांना घ्यावयाची काळजी
  3. १२ अ या आयकर कायद्यातील कलमानुसार नोंदणी म्हणजे काय? संस्थांसाठी ही नोंदणी का महत्वाची आहे? ती न केल्यास काय परिणाम होऊ शकतो
  4. ८० जी या कलमाखाली नोंदणी म्हणजे काय? ती कोणत्या संस्थांना करता येते? तशी नोंदणी करण्याचे महत्त्व कोणते?
  5. १२ अ आणि ८० जी अशी नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे? ती करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी न झाल्यास संस्थांवर काय परिणाम होतील?
  6. परकीय निधी नियमन कायदा १९७६, त्यात वेळोवेळी झालेले बदल व त्याचे सध्याचे स्वरूप व महत्त्व
  7. परकीय निधी नियमन कायदा १९७६ नुसार नोंदणी करण्याची पद्धत, अर्हता व आवश्यक कागदपत्रे
  8. नियमित करण्याच्या पूर्तता, वार्षिक पूर्तता व पुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया
  9. वरील विषयावर प्रश्नोत्तरे, अधिक स्पष्टीकरण, समारोप

Who can attend

सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी

Programme Dates: 26-27 September 2020

Session Plan: 2 days with 3 classes a day

Session 1 – 03.30 pm – 04.30 pm
Session 2 – 05:00 pm – 06.00 pm
Session 3 – 06:30 pm – 07.30 pm

Batch Size

35-40

Medium:

मराठी

Fee Details

₹ 600/- प्रति व्यक्ती (जी.एस.टी. सह)

सामाजिक संस्थासाठी आर्थिक कायदे प्रशिक्षण शिबिर

 

Verification

 

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

दिलीप नवेले, 9967429456, dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ, 9975415922, anilp@rmponweb.org