“The course must be 15 days long Because 5 days times don’t do justice with depthy subject and session will be 2 hours “

Deepak Singh

Kindly conduct program on Election Management,Nominations process & Election Expenditure repotting their legal consequences

Dr.Syed Imam Showkath Ali(Dr.SISA)

Would like to request you, please consider further extension of this course, Advance level training.

Surendra Kumar Vishnoi

सुसंस्कृत प्रभावी विचार मांडण्यासाठी संस्कृती आत्मसात करणे अत्यंत जरुरी आहे. विचार आणि शब्दांना एक धार निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाने विषयाची मांडणी करणे जरुरी असते. या आत्मविश्वासाला देहबोलीची योग्य साथ मिळाल्यास श्रोत्यां पर्यंत विषय सरळ आणि सोप्या भाषेत पोहचवता येतो. उत्तम वक्ता होणे जितके जरुरी आहे तितकेच प्रभावी वक्ता असणे गरजेचे असते, आपल्या वक्तव्यावर प्रभाव निर्माण होण्यासाठी वाचन आणि व्यासंग भाषण कलेत महत्वाचे अविभाज्य अंग आहे. वाचनाची आवड आणि त्या वाचनाचे परिक्षण करण्यातून अभ्यासू वृत्ती विकसित होण्यास मदत होऊन कोणत्याही विषयाचा सुक्ष्म अभ्यास करणे भाषण कलेत महत्वाचे आणि जरुरी असते.

हे आणि या सारखे अनेक विषय या वर्गात शिकायला मिळाले. नवीन परिचय आणि एक नवीन संघटन या वर्गातून उदयास आले. प्रभोधिनीचा परिवारात एक मोठ्या वृक्षात बदलला आहे, त्या वटवृक्षाच्या छायेत अनेक कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन समाज सेवा करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत. वर्गप्रमुख शैलेशजी आणि शीतल ताई या सारखे असंख्य कार्यकर्ते अहोरात्र एक ध्यास घेऊन कार्यविस्तार करत आहेत.भिविष्यात आपण सगळे जण या कार्यविस्ताराचा एक भाग होऊन सतत संपर्कात राहून प्रभोधिनी करता आपले योगदान देऊ.

संतोष कानडे वाशी,नवी मुंबई.

केदार शिंगणे

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन + नियोजन नेहमीच उत्तम असते हा माझा अनुभव आहे. आणि आनंद सर आणि मनिषा मॕडम यांच्या स्पष्ट, सहज आणि सोप्या भाषेत समजाऊन सांगण्यामुळे कार्यक्रमात कधी कंटाळवाणे वाटले नाही. आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार.

वकील अमित एकनाथ चव्हाण, उपाध्यक्ष, संस्कार भारती, पनवेल समिती, रायगड विभाग, कोकण प्रांत.

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे यावर्षीचे प्रशिक्षण शिबिर प्रथमच ऑनलाइन पद्धतीने झाले. शिबिराचा विषय होता : ‘कार्यक्रम संयोजन’ !
आणि या शिबिराचे उद्घाटन यावेळी परवा ९ जूनला आपल्या चतुरंगच्या विद्याधर निमकर यांच्या भाषणाने झाले. ‘संयोजन-नियोजन कां करावे ?’ या विषयावर झालेल्या निमकरांच्या उद्घाटनपर भाषणाची लिंक आपल्यासाठी मुद्दाम पाठवित आहे…..

मंजिरी वैद्य, मुंबई

आनंद सर आणि मनीषा मॅडम, तुमच्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून मिळवलेले ज्ञान तुम्ही अतिशय सध्या सोप्या भाषेत आम्हा सर्वांना दिले. तुम्हा दोघांचे कृतज्ञतापूर्वक आभार!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चे एकूण आयोजन, नियोजन आणि संयोजन प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार!
सहभागी झाल्या सर्वांचे आभार – तुमच्या सहभागातून खूप काही शिकायला मिळाले!

स्वाती इंदुलकर, ठाणे

मोनाली लोढा, नाशिक

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेली कार्यक्रम संयोजन आणि सुत्र संचालनाची तीन दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.महाराष्ट्रात ल्या विविध जिल्ह्यातुन अनेक संस्थांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.ऑनलाईन हे माध्यम नवे असुनही या सर्व प्रशिक्षणार्थी चा उत्साह वाखाणण्याजोगा होता….आणि यातून आम्हाला भरपुर नवीन शिकायला मिळाले याचा याचा आनंद प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला..हे तीन दिवस आम्हालाही वेगळा अनुभव देणारे आणि वेगळ्या गोष्टींचे आकलन करून देणारे होते. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल प्रबोधिनीचे महासंचालक मा. साठे सर, श्री.पांचाळ सर आणि श्री.नवेले सर यांचे मन:पुर्वक आभार !

आनंद क्षेमकल्याणी, नाशिक