रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेली कार्यक्रम संयोजन आणि सुत्र संचालनाची तीन दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.महाराष्ट्रात ल्या विविध जिल्ह्यातुन अनेक संस्थांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.ऑनलाईन हे माध्यम नवे असुनही या सर्व प्रशिक्षणार्थी चा उत्साह वाखाणण्याजोगा होता….आणि यातून आम्हाला भरपुर नवीन शिकायला मिळाले याचा याचा आनंद प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला..हे तीन दिवस आम्हालाही वेगळा अनुभव देणारे आणि वेगळ्या गोष्टींचे आकलन करून देणारे होते. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल प्रबोधिनीचे महासंचालक मा. साठे सर, श्री.पांचाळ सर आणि श्री.नवेले सर यांचे मन:पुर्वक आभार !