सर्वप्रथम तर उपेंद्र दाते यांचे मनापासून आभार… त्यांनी ह्या कार्यशाळेबद्दल कळवल्यामुळे मला ही कार्यशाळा करता आली… मी गेली 20 वर्ष नाट्य क्षेत्रात काम करतोय.. या 20 वर्षात खूप गोष्टी कळल्या आहेत.. पण प्रमोद दादा कडून काहीतरी नवीन मिळणार ह्याची खात्री होती… मी प्रमोद दादा म्हणल्यामुळे काहींच्या भुवया उंचावल्या असतील. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की मी प्रमोद दादा बरोबर नाटकातून एकत्र काम केलं आहे.. तेव्हापासून प्रमोद दादा कडून आवाजबद्दल तांत्रिक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.. पण नाटकाचे प्रयोग, दौरे, आणि नंतर दादाचा व्यस्त असणारा दिनक्रम ह्यामुळे ते शक्य झालं नव्हतं… पण आता रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळाली.. सर्व आयोजक टीमचे मनःपूर्वक आभार… 🙏🏻😊