मुंबई : ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’तर्फे शुक्रवार, दि. ३० जानेवारी आणि शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी मुंबई जवळील उत्तन कॅम्पसमध्ये ‘मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट’ (MILM) अंतर्गत भारतातील पहिल्या ‘मॉडेल जी-२०’चे आयोजन करण्यात येत आहे. मॉडेल जी-२० हे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायीकांसाठी एक व्यासपीठ आहे. ‘जागतिक भागीदारी : संधी आणि आव्हाने’ या थीम अंतर्गत कार्यक्रमाचे एकूण मुख्य ट्रॅक(G20), फायनान्स ट्रॅक(F20) आणि सिव्हिल सोसायटी ट्रॅक(C20) असे तीन ट्रॅक असतील.
मुख्य ट्रॅकमध्ये ‘जागतिक शांततेद्वारे समृद्धी मिळवणे’, फायनान्स ट्रॅकमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीचे लोकशाहीकरण तर सिव्हिल सोसायटी ट्रॅकमध्ये ‘सामाजिक समावेशकता फॉर ग्लोबल युनिटी’ या विषयांवर चर्चा आणि वादविवाद होतील. यात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र, आकर्षक रोख बक्षिसे मिळवण्याची संधी आहे. तसेच मॉडेल जी-२०च्या माध्यमातून प्रतिनिधींना बोलण्याचे कौशल्य, संशोधन क्षमता आणि मुत्सद्दीपणा वाढवण्याचीही संधी आहे. अंडरग्रेज्युएट, पोस्ट ग्रेज्युएट, पीएचडी धारक आणि तरुण व्यावसायिकांना सहभागी होण्यासाठी आणि बदल्यात जागतिक व्यवस्थेसाठी आपल्या कल्पना व उपाय मांडण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/12/20/Model-G-20-in-program-in-Mumbai.html